मला एक्स्पोर्ट करायचा आहे! —————————————–
I want to start Export Business !
बरेच लोक म्हणत असतात. मग काही जण , जे एक्स्पोर्ट करतात त्यांना विचारतात , मार्केट मध्ये चौकशी करतात, काही जण ट्रैनिंग घेतात. काहीजणांना माहिती मिळते , काहींना नाही आणि काहीतर अर्धवट माहिती गोळा करतात.
इतके असून सुद्धा बरेच लोक एक्स्पोर्ट सुरु करत नाहीत, का? कारणे खुप असतील कदाचित, पण मला असे वाटते कि जर तुम्हाला एक्सपोर्टर व्हायचे असेल तर तुम्हाला फक्त एक्स्पोर्ट आणि इम्पोर्ट कसा करायचा हे माहित असून चालणार नाही तर त्या बरोबर खालील 2 गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतील
१) संयम (Patience) – एक्स्पोर्ट बिझिनेस मध्ये संयम खुप महत्वाचा आहे. कस्टमर मिळत नाही म्हणून बरेच जण ओरडत असतात, पण कस्टमर शोधण्यासाठी तुम्ही किती फॉलोअप केला? किती मेल्स पाठवल्या ? किती वेळा कॉल केले? तुम्ही सांगाल बरेच प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही.
पण प्रयत्न केले असे तेव्हाच म्हंटले जाते जेव्हा ते यशस्वी होतात. म्हणजेच तुमचा संयम कमी पडतोय, आणि जर एक्स्पोर्ट करायचा असेल तर संयम ठेवावा लागेल. कस्टमर मिळत नाही तोपर्यंत संयम ठेवावा लागेल , तरच यशस्वी व्हाल.
भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा
२) चिकाटी ( Persistence) – जसा संयम महत्वाचा आहे तशीच चिकाटी सुद्धा तेव्हडीच महत्वाची आहे. तुम्ही कस्टमर मिळवण्यासाठी मेल्स, फोन कॉल कराल आणि संयम ठेवाल कि ते रिप्लाय देतील पण नुसते हातावर हात ठेवून काहीच होणार नाही तर चिकाटीने त्या गोष्टीचा फॉलोअप करावा लागेल. सतत कस्टमर च्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावे लागेल, वेग वेगळ्या पद्धतीने त्याला पटवून द्यावे लागेल कि तुमचा प्रॉडक्ट आणि तुमची कंपनीच का बेस्ट आहे ?
बेलारूस च्या एक्सहिबिशन मध्ये एका सरांची ओळख झाली होती. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी एक इंसिडेन्ट शेयर केला. ते स्वतः हळदी पाउडर , मिरची पाउडर युरोप आणि Russia ला एक्स्पोर्ट करतात . त्यांचा जर्मनी चा एक रेगुलर कस्टमर होता. हळदीचा एक कंटेनर सप्लायर ने उशिरा लोड केल्याने कस्टमर ला डिलिव्हरी उशिरा मिळाली , जर्मनी च्या कस्टमर ने पैसे तर दिले पण तिथून पुढे ऑर्डर मात्र दिली नाही. जर्मनी वेळेच्या च्या बाबतीत खुपच स्ट्रिक्ट आहे.
पण एका चुकीमुळे त्यांचा एवढ्या वर्षांपासून असलेला कस्टमर मात्र गेला. त्या सरानी खुप प्रयत्न केले त्याला कॉन्व्हिन्स करण्याचे पण काही उपयोग नाही. सरानी हार नाही मानली. न चुकता प्रत्येक सोमवारी ते कस्टमर ला रेट्स आणि प्रॉडक्ट्स बद्धल माहिती द्यायचे, पण कस्टमर चा मात्र काहीच रिप्लाय यायचा नाही. हा खेळ एक नाही , दोन नाही तब्बल ५ वर्ष चालला. अखेर ५ व्या वर्षी सरांच्या प्रयत्ना मधील सातत्य आणि चिकाटी पाहून कस्टमर ने रिप्लाय दिला व ऑर्डर पण दिली.
बिझनेस कोच kdsushma यांचे एक्स्पोर्ट बिझिनेसचे व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
ती ऑर्डर आणि कस्टमर परत मिळवण्यासाठी त्यांना ५ वर्ष संयम, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न करावे लागले. आता प्रत्येकाला एवढ्या दिवस कदाचित वाट नाही पाहावी लागणार. पण किती दिवस लागतील हे तुमचे प्रयत्नच ठरवतील.
मग आहे का तयार एक्सपोर्टर होण्यासाठी? चला मग करूया आतापासूनच सुरुवात.
अधिक माहिती साठी संम्पर्क करा –
MOB – 8421017762 / 9370054879
Email – support@kdsushma.com
Web – www.globalfortunemission.com
FB page / Youtube/ Linkedin/ Instagram / Twitter – KDSushma
Very Nice
Very Nice
Macrobid 100mg Where To Buy cialis 5 mg best price usa Buy Generic Effexor Xr
Macrobid 100mg Where To Buy cialis 5 mg best price usa Buy Generic Effexor Xr